तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती २०२५ स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

जिल्ह्यातील महसूल विभागावर सध्या मोठा ताण आहे. जिल्ह्यात दोन हजारांवर महसुली गावे असूनही केवळ ६८५ तलाठी पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल ४२ पदे सध्या रिक्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे, सातबारा, आठ अ, उत्पन्न प्रमाणपत्रे, फेरफार, नैसर्गिक आपत्तीचे सर्वेक्षण अशा महत्त्वाच्या कामांसाठी गावकऱ्यांना शहरात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.

तलाठी भरती संदर्भातील ताजे अपडेट

राज्यातील महसूल विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात येत असून तब्बल १७०० तलाठी पदे लवकरच भरली जाणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार दाते यांना लेखी उत्तर देत ही माहिती दिली आहे. वित्त विभागाची मान्यता मिळताच ही भरती प्रक्रिया सुरु होईल अशी अपेक्षा आहे.

तज्ज्ञांच्या मते, ही प्रक्रिया डिसेंबर २०२५ च्या अखेरपर्यंत सुरु होऊ शकते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

मागील भरतीचा आढावा

  • २०२३ मध्ये ४७९३ तलाठी पदांची जाहिरात
  • ४२१२ उमेदवारांना नियुक्ती आदेश
  • ३८५० उमेदवारांनी पदभार स्वीकारला
  • तरीही ९४३ पदे रिक्तच
  • याशिवाय आणखी ७५७ पदे रिक्त = एकूण १७०० रिक्त पदे

पेसा क्षेत्रातील भरती

२०२३ च्या भरतीदरम्यान पेसा क्षेत्रातील उमेदवारांबाबत वाद निर्माण झाला होता. न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना ११ महिन्यांची तात्पुरती नियुक्ती दिली आहे. निर्णयानंतर कायम नियुक्तीबाबत शासन निर्णय घेणार आहे.

प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही संधी

मागील भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह इतर ठिकाणची रिक्त पदेही भरली जाणार आहेत.

महत्वाच्या लिंक्स :

1 thought on “तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती २०२५ स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुवर्णसंधी”

Leave a Comment